चुंबक म्हणजे काय
चुंबक म्हणजे काय?
चुंबक हा मॅग्नेटाइड नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणाऱ्या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड. यास लोटसोन असे नाव होते. या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते इ.स. पूर्व 800 च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.
चुंबकीय क्षेत्र
चुंबकाच्या प्रभावाच्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र म्हणतात .लोखंड, कोबाल्ट निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात.
चुंबकाची किती प्रकार आहेत?
चुंबकाचे दोन प्रकार पडतात.
1कायमस्वरूपी (parmanent magnet)
2 तात्पुरते (temporary magnet)
कायमस्वरूपी चुंबकीय निसर्गात मिळते. तर तात्पुरते चुंबक हे मानवनिर्मित असते. म्हणजे एखाद्या धातूतून आपण विद्युत पुरवठा केला असता त्यात सभोवती विद्युत चुंबक क्षेत्र निर्माण होते.
चुंबक आकारावरन काही प्रकार खालील प्रकारे.
१ नालाकृत चुंबक
२ चकातीकृत चुंबक
३ रिंगण कृत चुंबक
४ दांडाकृती चुंबक
विद्युत चुंबक
जेंव्हा एखाद्या तारेच्या वेटोळ्यातुन विद्युत प्रवाहित केल्या जाते तेंव्हा त्या तारेसभोवताल चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.विद्युत प्रवाह बंद केला असता चुंबकीय क्षेत्र नष्ट होते. हेच विद्युत चुंबक होय. शक्यतोवर, लोहचुंबकीय धातुंवरच हे तारेचे वेटोळे करतात.त्यामुळे, त्या धातुतही चुंबकत्व निर्माण होते.

Useful information
ReplyDeleteUseful information
ReplyDelete