Posts

Showing posts from April, 2024

चुंबकाचे गुणधर्म

  1  *चुंबकाचे गुणधर्म* ०१. लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते. ०२. चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो. ०३. दक्षिणेकडे स्थिर असणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणाऱ्या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात. ०४. चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणाऱ्या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात. ०५. केवळ एकच ध्रुव असलेला चुंबक मिळविणे अशक्य आहे. ०६. चुंबक तुटल्यास तुटल्याजागी विरूध्द ध्रुव निर्माण होतात. ०७. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते तर सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. प्रतिकर्षण हीच चुंबकाची खरी कसोटी मानतात. ०८. जेव्हा एखादी सुची चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने विचलित होत असेल तर चुंबकसुई उत्तर ध्रुव हा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते. ०९. विद्युत वाहकातून प्रवाह जातांना चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ही गोष्ट प्रथम ओरस्टेड या शास्त्रज्ञाने दाखवून दिली. चुंबकीय क्षेत्राची दिशा विद्युत धारेच्या दिशेवर अवलंबून असते. १०. जे पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठे...

चुंबकाची गंमत व त्याचा इतिहास

Image
 चुंबकाची गंमत व त्याचा इतिहास   तुम्हाला माहिती आहे का ! १. पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाहीत. असे का होते ? २. फ्रीजचे दार लावत असताना एका ठराविक अंतरावरून ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही. असे का होते ? या उपकरणांमध्ये चुंबक वापरतात. पिन होल्डरच्या झाकणामध्ये आणि फ्रिजच्या दारामध्ये चुंबक बसवलेला असतो. चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटतात. चुंबक म्हणजे काय? ज्या पदार्थांकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात, अशा पदार्थाला ‘चुंबक’ म्हणतात. पदार्थाच्या या गुणधर्माला ‘चुंबकत्व’ असे म्हणतात. करून पाहूया. १. तुमच्या वापरातील वेगवेगळ्या वस्तूंजवळ प्रयोगशाळेतील एक चुंबक न्या. त्यांपैकी कोणत्या वस्तूंना चुंबक चिकटते ? ती वस्तू कोणत्या पदार्थाची बनली आहे? ते बघा. तुम्ही वापरत असलेल्या पदार्थांचे ‘चुंबकाला चिकटणारे’ व ‘चुंबकाला न चिकटणारे पदार्थ असे गट करा. २. वाळू, कागदाचे कपटे, लाकडाचा भुसा, लोखंडाचा कीस, टाचण्या यांचे मिश्रण एका बशीमध्ये घ्या व चुंबक त्या मिश्रणावरून फिरवा. काय दिसले? चुं...

चुंबक म्हणजे काय

Image
  चुंबक म्हणजे काय? चुंबक हा मॅग्नेटाइड नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणाऱ्या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड. यास लोटसोन असे नाव होते. या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते इ.स. पूर्व 800 च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे. चुंबकीय क्षेत्र चुंबकाच्या प्रभावाच्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र म्हणतात .लोखंड, कोबाल्ट निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात. चुंबकाची किती प्रकार आहेत? चुंबकाचे दोन प्रकार पडतात. 1कायमस्वरूपी (parmanent magnet) 2 तात्पुरते (temporary magnet) कायमस्वरूपी चुंबकीय निसर्गात मिळते. तर तात्पुरते चुंबक हे मानवनिर्मित असते. म्हणजे एखाद्या धातूतून आपण विद्युत पुरवठा केला असता त्यात सभोवती विद्युत चुंबक क्षेत्र निर्माण होते. चुंबक आकारावरन काही प्रकार खालील प्रकारे. १ नालाकृत चुंबक २ चकातीकृत चुंबक ३ रिंगण कृत चुंबक ४ दांडाकृती चुंबक  विद्युत चुंबक जेंव्हा एखाद्या तारेच्या वेटोळ्यातुन विद्युत प्रवाहित केल्या जाते तेंव्हा त्या तारेसभोवताल चुंबकीय क्षेत्र निर्माण होते.विद्युत प्रवाह बंद केला असता चुंबकीय क्षेत्र...